Ticker

6/recent/ticker-posts

सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आलाय दुष्काळ कधी जाहीर करणार;आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न


ज्ञानेश कुमारवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकायल पाहिजे:आदित्य ठाकरे

सोलापूर : शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. पावसाने हुलकावणी दिल्याने सोलापुरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.दुष्काळ सदृश परिस्थिती दौरा करण्यासाठी आदित्य ठाकरे सोलापुरात आले होते. शनिवारी सकाळी माध्यमांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आला तरीही दुष्काळ जाहीर केला नाही. 





बाजूच्या कर्नाटक राज्यात दुष्काळ जाहीर झाला,मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशाची वाट पाहतायत असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. शरद पवार मोर्चा काढतात,आम्ही शिवसेनेच्या वतीने देखील मोर्चे काढत आहोत, पण आक्रोश व्यक्त होत आहे. ही वेळ का येतेय हे पाहणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो,हे सर्व बाजूला ठेवू,आम्ही सरकारची सर्व ताकद शेतकऱ्यांच्या मागे लावू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांना दिली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सारख्या घटना घडायच्या आधी सरकारने मदत करणे गरजेचे आहे. सर्व ठिकाणी मदत केंद्रे स्थापन करा. जमाना हा स्वीगी सारखा आहे,तुमच्या कडे लोक येण्यापेक्षा तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचता असा सल्ला आदित्य ठाकरेंनी सरकारला दिला आहे.

ज्ञानेश कुमार यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे;आदित्य ठाकरे - ज्ञानेश कुमार आणि वोट चोरी हे आम्ही 2024 पासून सांगत आहोत. आम्ही सगळ्यांनी प्रेझेंटेशन दिले आहे. माझ्या स्वतःच्या मतदार संघात साडे चोवीस हजार बोगस मतदार कसे होते, त्याबाबत मी पुराव्यानिशी दाखवले होते. हे सगळं झाल्या नंतर देशात वोट चोरी होते हे स्पष्ट झाले आहे. ज्ञानेश कुमार यांना पदमुक्त नाही तर त्यांना राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. काँग्रेसने आंदोलन केलं आहे. आमचे देखील आंदोलन सुरू होतील. अभिजित दीपकेच्या आंदोलनात सहभागी होऊ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.