नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. CTET परीक्षेसाठी पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची संधी देण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी निर्धारित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांना 1 सप्टेंबर 2026 पर्यंत नव्याने अर्ज करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे CTET परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही अखेरची संधी ठरणार आहे.
दरम्यान, CTET परीक्षेची निश्चित तारीख 1 सप्टेंबर 2026 नंतर जाहीर करण्यात येईल,अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी आणि अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे व माहिती काळजीपूर्वक सादर करावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी CTET संदर्भातील अधिकृत सूचना,पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रियेची माहिती तपासणे आवश्यक आहे.
ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी,शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि संबंधित उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा.
आपल्या मित्रांना ही बातमी शेअर करा.
