Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेत कणबसच्या जि.प.शाळेची दमदार कामगिरी; १४ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत

कणबस (गं.) च्या जि.प.प्राथमिक मराठी शाळेचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव; विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

सोलापूर : एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा,कणबस (गं.) येथील इयत्ता ७ वीच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फलित मानले जात असून,या यशामुळे विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी क्र.विद्यार्थ्याचे नाव गुण टक्केवारी गुणवत्ता क्रमांक
१ ) श्रुती सिद्धाराम डांगे
२५४. ८४.६६% ४८
२) महादेव गौरीशंकर माळी
२५०. ८३.३३% ६५
३) पूजा दयानंद दुलंगे
२५०. ८३.३३% ६६
४) भाग्यश्री प्रकाश बनाळे
२५०. ८३.३३% ७३
५) आरोही दत्तात्रय कदम
२४६. ८२% ९५
६) लक्ष्मीकांत महांतेश गौडगाव
२४०. ८०% १३०
७) सृष्टी मुनिन्द्र कोळी
२४०.८०% १३९
८ ) सौजन्या काशिनाथ मणूर
२३८.७९.३३% १५८
९)  सारिका शिवाजी दुलंगे
२३८.७९.३३% १६०
१०) श्रावणी लक्ष्मण चिट्टे
२३६. ७८.६६% १७१
११) अल्फिया नजीर मुजावर
२३०. ७६.६६% २१५
१२) प्रथमेश बसवराज शरणार्थी
२२८. ७६% २२५
१३) स्वरुप यल्लप्पा कोळी
२२६.७५.३३% २६१
१४) भागेश प्रभुलिंग चंद्रपाटले
२२०. ७३.३३% RA-१७

शाळेच्या यशाबद्दल कौतुक - एकाच शाळेतील १४ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास,सराव आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हे यश मिळवले आहे.

या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून,त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक,मुख्याध्यापक आणि पालक यांचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कणबस (गं.) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्तेची आणि स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्याची मोठी क्षमता असल्याचे अधोरेखित झाले आहे.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!