Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक सैफन शेख यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान


सोलापूर : पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून एक वसा, चळवळ आणि सामाजिक बांधिलकीचा ध्यास मानून समाजातील अन्यायग्रस्त,अत्याचारग्रस्त तसेच वंचित घटकांच्या न्याय-हक्कासाठी सातत्याने आवाज उठविणारे पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक व अभ्यासू पत्रकार सैफन शेख यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी साधू वासवाणी उद्यान,सोलापूर येथे हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी सैफन शेख यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित पत्रकार बांधवांनी त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



सैफन शेख हे आपल्या एमडी २४ न्यूजच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या दरबारात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित,पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे.





पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारांवर होणारे अन्याय, अत्याचार तसेच विविध प्रकारच्या समस्यांविरोधातही ते पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून सक्रियपणे काम करीत आहेत. त्यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल घेत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.



या सत्कार सोहळ्यास पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार,सोलापूर जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी, सचिव अंबादास गज्जम,शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे,सचिव रमेश दग्गारी,गणेश निंबाळकर,पत्रकार कृती समिती सचिव युनूस आत्तार,विष्णू सकट,सिद्धू हमाले,बसवराज हमाले,शाम वायदंडे,अक्षय देवकुळे यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी सैफन शेख यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला शुभेच्छा देत, “समाजातील वंचित आणि अन्यायग्रस्त घटकांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी त्यांचे कार्य असेच सुरू राहावे,” अशी भावना व्यक्त केली.