Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरातील बी-२ मिळकती फ्री-होल्डसाठी 21 ऑगस्टला विशेष कॅम्प


सोलापूर :  महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाच्या शासन निर्णय दिनांक 20 जुलै 2026 अन्वये सोलापूर नगर भूमापन हद्दीतील बी-2/लीज होल्ड मिळकतींचे शर्तभंग नियमानुकूल करणे तसेच बी-2 कमी करून फ्री-होल्ड (वर्ग-1) करण्याबाबत धोरणात्मक मंजुरी व सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

या शासन निर्णयाच्या अनुषंगाने पात्र नागरिकांकडून शासन निर्णयातील निकषांनुसार परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारणे व आवश्यक कागदपत्रांचे संकलन करण्यासाठी शुक्रवार,दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत बहुउद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय,सोलापूर येथे विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.



आवश्यक कागदपत्रे
१)  मागील तीन महिन्यांतील मालमत्ता कराची पावती/मालमत्ता पत्रकाची प्रत
२) नोंदणीकृत खरेदी दस्ताची सूची क्र. 2 ची नक्कल प्रत व खरेदी दस्ताची छायांकित प्रत
३) गहाणखत असल्यास त्याची छायांकित प्रत
४) गृह निर्माण संस्था असल्यास संस्थेचे अलॉटमेंट पत्र, संस्था नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र अथवा खरेदी दस्ताची प्रत
६) बांधकाम परवान्याची छायांकित प्रत
७) आधारकार्डची छायांकित प्रत तसेच इतर अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे

सदर विशेष कॅम्पमध्ये पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रस्ताव सादर करावा व या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक तथा नोडल अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.