मुंबईतील 'लोक भवन'मध्ये ड्युटीदरम्यान SRPF जवानाची आत्महत्या; मलबार हिल पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई : मुंबईतील 'लोक भवन' येथे पहारा देण्याचे कर्तव्य बजावत असताना कोल्हापूर येथील एसआरपीएफ (SRPF) गट क्रमांक १६ चे अंमलदार पी.सी. कौस्तुभ सांगळे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, मलबार हिल पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेबाबत अधिकृत माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
