Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात ५ लाखांची फसवणूक; व्यवसायासाठी कर्ज काढून देण्याच्या आमिषाने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


सोलापूर : व्यवसायासाठी बँकेतून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी रेखा रमेश सोनवणे (वय ४५, राहणार भीमाई निवास,राजस्व नगर, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय मल्लिकार्जुन तुपसाखरे,विक्की मल्लिकार्जुन तुपसाखरे, सोनाली अभिजीत राजकर आणि अभिजीत अरविंद राजकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





पोलीस माहितीनुसार,आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून व्यवसाय सुरू करण्यासाठी एसबीआय बाळीवेस शाखेतून ५ लाख रुपयांचे कर्ज काढून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर फिर्यादीच्या नावावर कर्ज काढून संबंधित रक्कम स्वतःकडे घेतली आणि ती परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

ही घटना ५ ऑगस्ट २०२४ पासून आजतागायत बाळीवेस परिसरात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.