Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती व प्रोत्साहनाचा नवा आराखडा


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ : शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती व प्रोत्साहनाचा नवा आराखडा

सोलापूर : नैसर्गिक आपत्तींमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व वित्तीय शिस्त रुजवण्यासाठी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” जाहीर करण्यात आली. योजनेचा उद्देश थकबाकीदारांना कर्जमुक्त करणे व नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेतून राज्यातील ५६ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी कोटीची कर्जमुक्ती मिळणार आहे.

कर्जमुक्तीचे निकष - १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी, ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत व ३१ मार्च २०२६ अखेर परतफेड न झालेल्या कर्जावर प्रति शेतकरी २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळेल. महात्मा फुले योजनेच्या लाभार्थींना ५० हजारांपर्यंत लाभ मिळणार. २ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर २ लाखांचा लाभ मिळेल. NPA खात्यांसाठी बँकांशी वाटाघाटी करून सुट निश्चित होईल.





प्रोत्साहनपर लाभ - नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ पैकी कोणत्याही दोन वर्षांत वेळेत परतफेड केल्यास ५० हजारांपर्यंत लाभ मिळेल. कर्ज रक्कम कमी असल्यास परतफेड केलेली रक्कम किंवा किमान ५ हजार,यापैकी जास्त रक्कम लाभ म्हणून मिळेल.

अपात्र कोण? मंत्री,खासदार,आमदार,स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, २५,००० पेक्षा जास्त वेतन/पेन्शन असलेले शासकीय अधिकारी-कर्मचारी,आयकर भरणारे,सार्वजनिक उपक्रमांचे अधिकारी व २५,००० पेक्षा जास्त वेतन असलेले सहकारी संस्थांचे पदाधिकारी अपात्र ठरतील.





अंमलबजावणी - योजना पूर्णपणे ऑनलाईन राबवली जाणार असून आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करून अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवले जाईल.

ही योजना थकबाकीदारांना थेट दिलासा,नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन व बँकिंग यंत्रणेला बळ देईल. पारदर्शक अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून ग्रामीण अर्थव्यवस्था स्थिर होण्यास मदत होईल.