Ticker

6/recent/ticker-posts

चहापान कार्यक्रम पार पडला; विरोधकांचा चहा-पाण्यावर बहिष्कार


मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात आलेला चहापानाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मात्र,विविध मुद्द्यांवर सरकारविरोधात भूमिका घेत विरोधी पक्षांनी या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विविध विकासकामे,जनकल्याणकारी योजना आणि राज्यासमोरील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची तयारी दर्शविली. दुसरीकडे,शेतकरी,बेरोजगारी,कायदा-सुव्यवस्था आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर सरकारला अधिवेशनात धारेवर धरणार असल्याचे विरोधी पक्षांनी स्पष्ट केले आहे.

चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत विरोधकांनी सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.