Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६’ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक


मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांचे हक्क अधिक बळकट करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक,सामाजिक तसेच कृषी क्षेत्रात अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित असलेल्या ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६’ संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीत महिला शेतकऱ्यांना जमीन,शेती व्यवस्थापन, शासकीय योजनांचा लाभ,प्रशिक्षण,तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेत अधिक सहभाग मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महिला शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विधेयकातील विविध तरतुदी अधिक प्रभावी करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आले.



यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,मंत्री दत्तात्रय भरणे,राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल,एम.एस.स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठान (एमएसएसआरएफ) यांच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन,वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील महिला शेतकऱ्यांचे योगदान अधिक प्रभावीपणे अधोरेखित करण्यासोबतच त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीपूर्ण धोरण राबविण्याच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला.