सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विभाग समन्वयक आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत आगामी काळातील पक्ष संघटन विस्ताराची रणनीती निश्चित करण्यात आली. तसेच आदरणीय मोदी सरकारच्या यशस्वी कार्यकाळाची तपपूर्ती,बूथ सक्षमीकरण,पदवीधर मतदार नोंदणी मोहीम तसेच ‘सरल ॲप’ आणि सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस प्रदेश सहसंयोजक आमदार विक्रम पाचपुते,पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर,विभाग सहसंयोजक विक्रम देशमुख,आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार समाधान आवताडे,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर,सभागृह नेते नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,चेतनसिंह केदार,जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य,उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विभागीय संवादक योगेश बाचल यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख लोकप्रतिनिधी,नगरसेवक,नगरसेविका, भाजपा शहर व जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत ‘शत-प्रतिशत भाजपा’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी बूथस्तरावरील संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा जनाधार अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
