Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर सर्वोपचार रुग्णालयात POCSO कायद्यावरील विशेष कार्यशाळा


डॉ.तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर-नर्सेसना कायदेशीर जबाबदाऱ्यांचे मार्गदर्शन

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली POCSO Act संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस सोलापूर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केले.

दुपारी सुमारे १.३० ते ४.०० या वेळेत पार पडलेल्या या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग कर्मचारी तसेच संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी POCSO कायद्याअंतर्गत असलेल्या विविध कायदेशीर तरतुदी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, अल्पवयीन पीडितांशी संवेदनशीलतेने वागण्याची पद्धत तसेच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.



कार्यक्रमादरम्यान बालचंद ढवळे यांच्या हस्ते बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी कार्यशाळेच्या उपयुक्ततेचे कौतुक करत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.

अल्पवयीन बालकांच्या संरक्षणासाठी आणि POCSO कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय विभाग अधिक सक्षम व जागरूक व्हावा, या उद्देशाने डॉ. तोडकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांची सकारात्मक, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेली कार्यशैली वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.