Ticker

6/recent/ticker-posts

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या साफसफाईची पाहणी; उपाययोजनांच्या सूचना


सोलापूर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना पाणी साचणे,नाले तुंबणे तसेच पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी सोलापूर शहरातील विविध प्रभागांमधील नाल्यांच्या साफसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,सभागृह नेते नरेंद्र काळे,आयुक्त सचिन ओंबासे,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार,महानगरपालिकेचे अधिकारी तसेच संबंधित प्रभागांतील नगरसेवक उपस्थित होते.



मान्यवरांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या नाल्यांच्या साफसफाईच्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्यात शहरातील कोणत्याही भागात पाणी तुंबणार नाही, यासाठी नाल्यांची वेळेत व प्रभावी साफसफाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.