Ticker

6/recent/ticker-posts

अल्पसंख्यांक आयोगाकडून आर्थर रोड कारागृहाची पाहणी


मुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष प्यारे खान यांच्यावतीने गुरुवार, दिनांक १६ एप्रिल रोजी मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड) येथे पाहणी करण्यात आली. या भेटीदरम्यान अल्पसंख्यांक कैद्यांच्या हक्क व विविध सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आले.



आयोगाच्या शिष्टमंडळाने कारागृहातील राहणीमान,आरोग्य सुविधा,अन्नव्यवस्था तसेच कैद्यांना उपलब्ध असलेल्या मूलभूत सेवांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अल्पसंख्यांक कैद्यांच्या समस्यांबाबतही विचारणा करण्यात आले.



यावेळी आयोगाचे सदस्य वसीम बुऱ्हाण,हॅप्पी सिंग,गुलाम रसूल तसेच आयोगाचे सचिव मिनाज मुल्ला यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.