बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेत आज एक आगळावेगळा आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला. संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सभागृहातील प्रत्येक सभासदाच्या बाकावर त्यांच्या प्रतिमेचे छायाचित्र ठेवण्यात आले होते.
“आंबेडकर – फॅशन नाही, पॅशन आहे” असा संदेश देत या उपक्रमातून लोकप्रतिनिधींनी बाबासाहेबांच्या विचारांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. सभागृहात प्रवेश करताच प्रत्येक सदस्याच्या समोर बाबासाहेबांचे छायाचित्र दिसत होते,ज्यामुळे वातावरण अधिक प्रेरणादायी आणि विचारमय झाले.
या उपक्रमामुळे सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची आठवण पुन्हा एकदा सर्वांना झाली. विविध पक्षांच्या सदस्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत, बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार करण्याची गरज अधोरेखित केली.
कर्नाटक विधानसभेतील हा उपक्रम राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून, “आंबेडकर हे केवळ नाव नाही तर एक विचारसरणी आहे” हा संदेश यामधून प्रभावीपणे देण्यात आला.
