कलबुर्गी : (निधन वार्ता) कलबुर्गी (कर्नाटक) येथील वीटभट्टी व्यावसायिक श्रीशैल जमादार यांच्या पत्नी श्रीमती इजूबाई श्रीशैल जमादार यांचे सोमवार, दि. २० एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. त्या मागील अनेक दिवसांपासून कॅन्सर या आजाराने त्रस्त होत्या.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा सून, नातू ,नातवंड व इतर नातेवाईक असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचा अंत्यविधी सोमवार, दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुलतानपूर क्लास रिंग रोड, एम. कमलनगर, कलबुर्गी येथून त्यांच्या स्वतःच्या शेतात, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांचे चिरंजीव शरणबसू श्रीशैल जमादार यांनी दिली.
