Ticker

6/recent/ticker-posts

"बेंगळुरू येथे जळालेल्या व भाजलेल्या रुग्णांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी"


बेंगळुरू येथे जळालेल्या व भाजलेल्या रुग्णांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गॅस स्फोट,ॲसिड हल्ले,घरगुती स्फोट,विजेचा धक्का तसेच इतर अपघातांमध्ये भाजलेल्या रुग्णांच्या जीवनात नवसंजीवनी देण्यासाठी Rotaplast International (अमेरिका) या संस्थेमार्फत तज्ञ डॉक्टरांची टीम या शिबिरात मोफत शस्त्रक्रिया करणार आहे,अशी माहिती शशिकांत मुनोत भारतीय जैन संघटना (BJS) यांनी दिली.

बेंगळुरू येथील Friends Welfare Foundation या संस्थेमार्फत मागील २९ वर्षांपासून अशा शिबिरांचे यशस्वी आयोजन केले जात आहे. आतापर्यंत ४५०० हून अधिक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
सदर शिबिरजैन हॉस्पिटल,गिरिनगर, ६ क्रॉस अवलाहल्ली, बेंगळुरू येथे आयोजित करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात प्राथमिक नोंदणी करण्यात येईल. ११ मे रोजी तपासणी होईल आणि निवडलेल्या रुग्णांवर १२ ते २१ मे २०२६ दरम्यान मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
हे शिबिर पूर्णपणे मोफत असून रुग्ण व त्यांच्या एका सहकाऱ्यासाठी प्रवास,तपासण्या,शस्त्रक्रिया,शस्त्रक्रियेनंतर राहण्याची व्यवस्था,भोजन व औषधे यांची संपूर्ण सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर असलेल्या या उपचारांचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा,असे आवाहन केतन शहा, BJS महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्याकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी संपर्क: 9148741707 / 9880307780.