सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुशल जैन यांचे जिल्हा परिषदेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज नुतन जिल्हा परिषद पदाधिकारी व सभापतींसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यशदा,पुणे आणि जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहताच सीईओ कुशल जैन यांचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी यशदा संस्थेचे उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ‘मी विकास यात्री’ हे पुस्तक देऊन जैन यांचे स्वागत केले.
या प्रसंगी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार,समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड.अमृता वाघे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही नुतन सीईओ कुशल जैन यांची भेट घेऊन संवाद साधत त्यांचे स्वागत केले.
