Ticker

6/recent/ticker-posts

साडेपाच वर्षांच्या मो.उस्मान शेखचा रमजानमधील पहिला रोजा पूर्ण; कुटुंबीयांकडून कौतुक


सोलापूर : रमजान महिन्यातील उपवासाला (रोजा) विशेष धार्मिक महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील अवघ्या साडेपाच वर्षांच्या मो.उस्मान (हसनैन) उबेद शेख या चिमुकल्याने आपला पहिला रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.



मो.उस्मान हा सोलापूर येथील सोशल प्रायमरी इंग्रजी शाळेत यूकेजीमध्ये शिक्षण घेत आहे. लहान वय असूनही धार्मिक संस्कारांची जपणूक करत त्याने रविवारी रमजान महिन्यातील आपला पहिला रोजा पूर्ण केला. एवढ्या लहान वयात,तेही उन्हाळ्याच्या दिवसांत पूर्ण दिवस उपवास ठेवणे हे निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.


या निमित्ताने नातेवाईकांनी मो.उस्मान याचा गुलपोशी करून सत्कार केला. सायंकाळी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत आनंददायी वातावरणात रोजा इफ्तार करण्यात आला. मो.उस्मानने इतक्या लहान वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे आई-वडील, आजी-आजोबा तसेच नातेवाईकांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आणि त्याला आशीर्वाद दिले. कुटुंबीयांनी सांगितले की,लहानपणापासूनच धार्मिक मूल्ये व संस्कार मुलांमध्ये रुजावेत,या हेतूने उस्मानने स्वतःहून रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती.





उस्मानच्या या कृतीमुळे कुटुंबीयांसह परिसरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी त्याचे अभिनंदन केले. रमजानच्या पवित्र महिन्यात अशा प्रकारे लहान वयात रोजा पूर्ण करणाऱ्या या चिमुकल्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.