सराईत आंतरजिल्हा मोटार सायकल चोर सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद रूपये ०४,४५,०००/- किंमतीच्या १५ मोटार सायकली हस्तगत.
सोलापूर : सोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघउकीस आणणे बाबत एम.राज कुमार पोलीस आयुक्त,डॉ.अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त गुन्हे,राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत गुन्हे शाखेस आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. त्यानुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेचे स.पो.नि.शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हे सी.सी.टी.व्ही फुटेजचे तांत्रीक विश्लेषण करुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते.
त्याअनुषंगाने सदर बझार पो.स्टे सोलापूर शहर येथे गु.र.नं. १६४/२०२६ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा घडल्यानंतर स.पो.नि.शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट देवून सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली. त्यानुसार पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेजचे अचूक विश्लेषण केले व पोलीस अंमलदार संदीप जावळे यांनी संशयीत गुन्हेगाराची ओळख पटविली. त्यानंतर दिनांक २८/०२/२०२६ रोजी स.पो.नि.शैलेश खेडकर यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, "एक इसम हा नंबर प्लेट नसलेली होंडा युनिकॉर्न कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल घेवून विक्री करण्यासाठी सोलापूर शहरातील विष्णू घाट जवळील फुटपाथ जवळ थांबलेला आहे" प्राप्त बातमीचे आधारे सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी जावून नमूद इसमास ताब्यात घेतले. त्यावेळी त्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याचे नाव सचिन अंकुश कात्रे, वय-४० वर्षे, मुळ रा.मसोबाची वाडी,ता.वाशी जि.धाराशिव सध्या रा.अंविका चौक,वीड असे असल्याचे सांगितले. पथकाने नमूद इसमाचे ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाचा संशय बळावला. त्यामुळे नमूद इसमास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांने सदरची मोटार सायकल काही दिवसापूर्वी दुपारचे वेळेस सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथून चोरी केल्याचे कबुल केले. तसेच नमूद इसमाकडे अधिक चौकशी करता त्याने मागील सहा महिन्यात अहिल्यानगर,बीड,जालना, धाराशिव,लातूर व सोलापूर जिल्ह्यातुन आणखी १४ मोटार सायकली चोरल्याची माहिती दिल्याने त्या मोटार सायकली पंचनाम्याने हस्तगत केलेल्या आहेत.
अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेने आरोपी सचिन अंकुश कात्रे यास ताब्यात घेवून एकूण १५ मोटार सायकली हस्तगत करून सुमारे ०४,४५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी एम.राज कुमार,पोलीस आयुक्त,सोलापुर शहर,डॉ.अश्विनी पाटील,पोलीस उप-आयुक्त गुन्हे/वि.शा., राजन माने,सहा.पोलीस आयुक्त गुन्हे तसेच अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील स.पो.नि.शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे,विनोद रजपुत, राजकुमार पवार,इम्रान जमादार,उमेश पवार,वसीम शेख, मंजुनाथ मुत्तनवार,दत्तात्रय सूळ,सागर मुटकुळे,चालक बाळासाहेब काळे,सतिश काटे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.
