सोनू सूद फाऊंडेशन कडून
१६० मुलींना डाळिंब रिअल ज्यूस व ग्लुकोजचे वाटप
सोलापूर : नागणसूर (ता.अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली व मुले शाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. शासनाच्या परिपत्रकानुसार २ ते ८ मार्च दरम्यान विविध विभागांच्या समन्वयातून महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्यात येत असून त्याच अनुषंगाने शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या. मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे,केंद्रप्रमुख श्रीमंत पुजारी,वीरेंद्र गजा व संतोष चिंचोळीकर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गुरुबाई प्रचंडे तर उपाध्यक्षा नागम्मा मठपती होत्या. व्यासपीठावर प्रेमा बनसोडे अंगणवाडी सेविका भौरम्मा सक्करगी,सविता थंब,राजश्री मोगली, श्रीदेवी विभुते व त्रिवेणी कळसगोंडा उपस्थित होत्या. बहुसंख्येने महिला व शाळेतील किशोरवयीन मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.
लक्ष्मीकांत तळवार यांनी महिला सक्षमीकरण सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. शिक्षण,आरोग्य,पोषण,कायदेविषयक जनजागृती, किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन आदी उपक्रमांद्वारे महिलांना सबलीकरणाचा संदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार नरुने यांनी केले,तर आभार प्रदर्शन कल्याणी गंगोंडा यांनी मानले.
कोट - सोनू सूद फाऊंडेशन सोलापूर जिल्हा प्रमुख विपुल मिरजकर यांच्या नेतृत्वात अक्कलकोट तालुका प्रमुख शरणप्पा फुलारी यांच्या सहकार्यातून डाबर कंपनीच्या सहयोगातून या प्रसंगी उपस्थित महिला व शाळेतील 160 मुलींना सोनू सूद फाऊंडेशनकडून डाळिंब रिअल ज्यूस व ग्लुकोजचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
महिला सक्षमीकरण सप्ताहाच्या निमित्ताने नागणसूर येथे महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश देणारा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शांता तोळनूरे,विजयश्री एंटमन,राजशेखर कुर्ले,कल्याणी गंगोंडा,राजकुमार खानापुरे,शोभा कलशेट्टी,चन्नम्मा बिराजदार,मलकप्पा हिप्परगी,राजकुमार नरुने,लक्ष्मीकांत तळवार आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ - नागणसूर जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली व मुले शाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे,गुरुबाई प्रचंडे,नागम्मा मठपती,प्रेमा बनसोडे,श्रीमंत पुजारी,वीरेंद्र गजा,संतोष चिंचोळीकर मुख्याध्यापिका शांता तोळनुरे,विजयश्री एंटमन,अंगणवाडी सेविका,माता भगिनी उपस्थित होते.
