Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन



जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महिला महोत्सव २०२६ चे आयोजन .
       
सोलापूर : ९ ते ११ मार्च २०२६ ह्या कालावधीत  सोलापूर महानगरपालिका महिला बालकल्याण विभाग व DAY NULM आयोजित महिला महोत्सवात सोलापुरात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचे,बचत गटांचे भव्य प्रदर्शन व विक्री आणि सांस्कृतिक कार्यक्रम ह्यांचा समावेश आहे.





महिला महोत्सवाचा प्रमुख उद्देश  महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी,त्याचा प्रचार व  प्रसार व्हावा हा असून या हेतूने दिनांक ९ ते ११ मार्च २०२६  रोजी महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शन,सोलापूर महानगरपालिका आवार,इंद्रभवन परिसर,पार्क चौक,सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूर मनपा अंतर्गत विविध विभागामार्फत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गरीब व गरजूवंत कुटुंबाचा सामाजिक,आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने महिलांचे स्वयं सहाय्यता बचत स्थापन करून विविध वित्त पुरवठा संस्थाकडून वित्त पुरवठा केला जातो व त्यातूनच महिलांनी उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे. 

प्रदर्शनामध्ये हातानी बनवलेले व आरोग्यदायी ताजे,स्वच्छ व चविष्ट खाद्य पदार्थ,विणकाम,लाकडी कोरीव काम,कापडी शिवणकाम केलेल्या वस्तु,सुगंधी वस्तु अगरबत्ती,विविध प्रकारचे मसाले,चटणी व पापड,ड्रेस मटेरियल,साडी,कडक भाकरी,शेंगा चटणी,शेंगा पोळी,जवस,कारळ,शेंगा,शेंगा पोळी, धपाटे,सर्व प्रकारचे पापड विक्री,मसाले,तिखट मसाले,खाद्यपदार्थ,हर्बल तेल,झाडू,खराटा,मूर्ती विक्री, कॉस्मेटिक,वडा पाव,पाणी पुरी,चायनीज पदार्थ,फ्रुट धपाटे कॉकटेल पेय,मसाले उन्हाळी काम,बिस्कीट,अगरबत्ती,धूप,ज्यूस,गुळ पावडर पुरण प्रीमिक्स नाचणी ज्वारी बिस्कीट हेल्थ ड्रिंक पावडर,यासह अनेक वस्तु प्रदर्शनात योग्य भावात विक्री करिता उपलब्ध असतील.

महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहरातील महिलांना आपले कलागुण सादर करता यावे या करिता विविध  सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन हि करण्यात आलेले आहे. यामध्ये १६ वर्षापुढील सर्व मुली व महिला करिता स्पर्धा हि खुली असणार आहे,तरी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणी ची स्वतंत्र गुगल फॉर्म लिंक तयार केली आहे तसेच कार्यालयात संपर्क साधून आपली नावनोंदणी महिला करू शकतात. स्पर्धेची प्राथमिक फेरी ७ मार्च रोजी कॅम्प प्रशाला गांधी नगर येथे होणार आहे,स्पर्धा या पुढील प्रमाणे आहेत.





वैयक्तिक डान्स/सोलो डान्स             (०९ मार्च २०२६ वेळ सायंकाळी ५ वाजता )
समूह नृत्य /ग्रुप डान्स                     (०९ मार्च २०२६ वेळ सायंकाळी ५ वाजता )
होम मिनिस्टर (अंतर्गत विविध स्पर्धा )    (१० मार्च २०२६  वेळ सायंकाळी ०५ वाजता )
वैयक्तिक गीत गायन                        (११ मार्च २०२५ वेळ सायंकाळी ६ वाजता )
फॅशन शो /  वेशभूषा स्पर्धा             (११ मार्च २०२६ वेळ सायंकाळी ६ वाजता )


स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक ११ मार्च रोजी सायंकाळी ८  वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा तसेच प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकानी भेट देवून खरेदी करावी व महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल,सोलापूर महानगरपालिका व डॉ.सचिन ओंबासे , आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी केले आहे.
नावनोंदणी करिता संपर्क - 9011385200.