Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पोलीस पाटील यांची होणार नियुक्ती ?


सोलापूर : ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपलेला असून त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नुकत्याच न्यायालयाने माजी सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे पारदर्शक,निष्पक्ष व जनहिताचा विचार करून योग्य व्यक्तीची नियुक्ती होणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रत्येक गावामध्ये सुशिक्षित व पदवीधर असणारे पोलीस पाटील हे प्रशासनाचा कान,डोळा आणि नाक म्हणून कार्य करत असतात. गावाच्या नेमक्या गरजांची माहिती पोलीस पाटलाइतकी इतर कोणाला असत नाही. अपघात असो की चोरी,घरगुती वाद असो की सामाजिक प्रश्न असो पोलीस पाटलांविषयी सर्वांनाचा आदर वाटतो. संकटकाळी पोलीस पाटीलच आधार वाटतात. गावातील कायदा व सुव्यवस्था,शासनाच्या योजना,जनतेच्या अडचणी यांची त्यांना सखोल माहिती असते. गावपातळीवर त्यांचा सर्व घटकांशी समन्वय असतो आणि ते प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडताना दिसून येतात.

त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पोलीस पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी,जेणेकरून ग्रामस्थांना न्याय्य,पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन मिळेल. अशी मागणी होताना दिसत आहे.