Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा क्षयरोग (TB) विभागात लाखोंचा भ्रष्टाचार...



सोलापूर : सोलापूर जिल्हा क्षयरोग (TB) विभागात मागील दोन वर्षांपासून झालेला भ्रष्टाचार समोर आला आहे. माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती पुराव्यासहित जिल्हा क्षयरोग विभागाने दिली आहे. प्रयोग शाळेसाठी लागणारे साहित्य खरेदी करावयाचे आहे असे लेखी सांगून उप संचालक (DD), जिल्हा क्षयरोग अधिकारी(DTO) या अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आहे. पण ते कर्मचारी कोण आहेत, किती लाखांचा शासकीय अपहार केला आहे, याबाबतचे सविस्तर वृत्त लवकरच प्रकाशित केले जाणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर,आरोग्य सचिव,आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबावडेकर,क्षयरोग विभागाचे उपसंचालक (TB) डॉ.राधाकिशन पवार,यांच्याकडे पुराव्यासह कागदपत्रे जमा करण्याचे कामकाज सुरू झाले आहे.





सोलापूर जिल्ह्यातील क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लाखोंचा मुद्देमाल खरेदी केल्या सारखे भासवून मोठा भ्रष्टाचार केला आहे. मात्र एका कर्मचाऱ्याची या सर्व भ्रष्टाचारावर बारीक नजर होती.TB डिपार्टमेंट मधील प्रयोगशाळेत होत असलेला भ्रष्टाचार आतापर्यंत समोर आला नव्हता,माहिती अधिकारातून अनेक धक्कादायक आकडेवारी प्राप्त झाली आहे.



काही महिन्यापूर्वी सोलापूर जिल्हा क्षयरोग (टीबी) विभागाचे प्रभारी चार्ज डॉ.संतोष नवले यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले भ्रष्टाचाराबाबत काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागले आहे. 

एमडी२४न्यूजने माहिती अधिकारातून ही माहिती प्राप्त केली आहे. सबळ पुरावे हाती लागल्याने लाखोंचा भ्रष्टाचार समोर आला आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कसे भ्रष्टाचार करतात याचा उत्तम नमुना समोर आला आहे.





सोलापूर जिल्ह्याला जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून अद्याप कुणालाही नियुक्ती मिळाली नाही. प्रभारी म्हणून सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले कामकाज पाहत आहेत. तत्कालीन जिल्हा क्षयरोग अधिकारी मीनाक्षी बनसोडे यांची दिशाभूल करत हा भ्रष्टाचार झाला की काय अशीही चर्चा केली जात आहे. भ्रष्टाचार कसा केला,कोण केला,याबाबतचे सविस्तर वृत् नावानिशी प्रकाशित केले जाणार आहे.