Ticker

6/recent/ticker-posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलामध्ये शिवजयंती उत्साहात...


सोलापूर : कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात आणि विधायक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आली. 





छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांच्या हस्ते करण्यात आले. 
त्यानंतर कोंडी गावातून  जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी कोंडी परिसर दणाणून सोडला. ही भगवी शिवरायांनी संपूर्ण गावातून अतिशय शानदार वातावरणात निघाली. 





मर्दानी खेळ लेझीम भारदार अशा वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून सर्व ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  त्याचबरोबर बाल शिवाजीचा पाळणा आणि इतर सांस्कृतिक कलांच्या माध्यमातून विविध उपकर्माद्वारे शिवजयंती साजरा करण्यात आली. या भगव्या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व विद्यार्थी भगवे झेंडे घेऊन आणि भगवा कुडता परिधान करून आल्यामुळे सर्व वातावरण शिवमय आणि भगवे झाले होते. 

त्यानंतर गावामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला संचालक गणेश निळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर या भगव्या शिवरायांचा समारोप जिजाऊ ज्ञान मंदिर येथे करण्यात आला. 





यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर  कर्मचारी  यांनी परिश्रम घेतले.आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचे  लेझीम चे ढोल ताशाच्या निनादात केलेले सादरीकरण आणि नृत्यकला सर्वांना भावली. जगात भारी 19 फेब्रुवारी याच दिवशी संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांची   शिवकन्या वीराक्षी निळ हिचा वाढदिवस जिजाऊ ज्ञान मंदिरामध्ये उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

हे भगवी शिवरायांनी जिजाऊ ज्ञान मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. शिव भोजनाचा आस्वाद घेऊन छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्साही वातावरणात समारोप करण्यात आला.