Ticker

6/recent/ticker-posts

शहाजहान शेख यांची कासेगांव उपसरपंचपदी निवड


शहाजहान म.हनिफ शेख यांची कासेगांव उपसरपंचपदी निवड 

सोलापूर : जिल्ह्याच्या सीमावर्ती गांवापैकी एक गांव अशी ख्याती असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माजी सैनिक तथा ग्रामपंचायत सदस्य शहाजहान म. हनिफ शेख यांची शुक्रवारी कासेगांव उपसरपंचपदी निवड झाली. गेल्या ०४ दशकात पहिल्यांदा अल्पसंख्याक मुस्लिम सदस्याला उपसरपंच पदाचा मान मिळाला आहे.


डिसेंबर २०२३ मध्ये कासेगांव सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक पार पडली. या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदी यशपाल  वाडकर विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते. उर्वरित सदस्यापैकी उपसरपंच पदाची माळ ज्ञानेश्वर रोकडे यांच्या गळ्यात पडली होती. त्यांच्या आपसातील ठरावानुसार अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर ज्ञानेश्वर रोकडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.





उपसरपंच पदाच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस ग्रामविस्तार अधिकारी एस. आर. कलाल यांचीही उपस्थिती होती. 





सरपंच यशपाल वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक ०४ चे सदस्य शहाजहान महमद हनिफ शेख यांचं नांव आले होते. त्यावेळी शहाजहान म.हनिफ शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर शहाजहान शेख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपसरपंच शेख यांनी सरपंच वाडकर आणि सर्व सदस्यांसह ग्रामदैवत शंभू महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

यावेळी माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक नेताजी पाटील, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे,ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले,भरत जाधव,नारायण जाधव,सुरेखा रामहरी चौगुले, कल्पना श्रीकांत राऊत,संगिता मच्छिंद्र गायकवाड,अनिता सुरेश हेडे,सोनाली केतन पाटोळे,सोनाली सत्यपाल वाडकर तसेच राजाराम पाटोळे,रघुनाथ चौगुले (गायकवाड), ग्रामपंचायत माजी,सदस्य भाऊराव जाधव,माजी सैनिक मौला शेख,तुकाराम माने,महात्मा गांधी ग्राम तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय पवार,माजी अध्यक्ष निशीकांत पाटील आणि बालाजी चौगुले उपस्थित होते.