Ticker

6/recent/ticker-posts

खंडणी प्रकरणातील पत्रकार नितीन कांबळे यास जामीन मंजूर


सोलापूर : शिवभोजन योजनेतील हॉटेल व्यावसायिकाकडून २,४४,५००/- रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी सदर बझार पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर १०५० /२०२५ या गुन्ह्यातील अटकेतील आरोपी/पत्रकार नितीन कांबळे यांस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा ने २५०००/ रुपयांच्या जामीनावर सोडण्याचे आदेश केले.





यात सविस्तर हकीकत अशी की,शिवभोजन चालक तथा हॉटेल समताचे इरफान शेख व अन्य शिवभोजन चालकांविरुद्ध तक्रारी अर्ज करून आणि अट्रॉसिटीची केसची धमकी देऊन रोख व फोन पे च्या माध्यमातून खंडणी घेतल्याच्या गुन्ह्यात नितीन कांबळे यांस दिनांक २५/१२/२०२५ रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्या गुन्ह्यात आरोपीस जामीन मिळावा,म्हणून ॲड.योगेश नागनाथ पवार यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जाला सरकारी वकील कुरुडकर यांनी व मूळ फिर्यादीने जोरदार विरोध केला. आरोपीचे वकील ॲड.योगेश पवार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा ने आरोपीस जामीन मंजूर केला.

यात आरोपीतर्फे ॲड.योगेश नागनाथ पवार आणि ॲड.दिपाली सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.