जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा
सोलापूर : राज्यात दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के व मान्यवर ज्येष्ठ पत्रकार यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार शहाजान आत्तार,बाळासाहेब वाघमोडे,भगवान परळीकर,राजेंद्र पवार,चंद्रशेखर गायकवाड, योगेश तुरेराव,बिराजदार,विश्वनाथ व्हनकोरे,संतोष शेलार, अनिल शिराळकर तसेच कार्यालयातील कर्मचारी शरद नलवडे,संजय घोडके,दिलीप कोकाटे,भाऊसाहेब चोरमले, प्रविण चव्हाण,पुजा वैद्य,पंकज बर्दापूरकर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी स्वागत करून त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार दिनाच्या औचित्याने बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या दर्पण या वृत्तपत्राद्वारे समाजजागृती,शिक्षणप्रसार आणि राष्ट्रीय चेतना निर्माण करण्याच्या योगदानाची माहिती देण्यात आली.
जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के यांनी आपल्या भाषणात पत्रकार दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, पत्रकारितेतील सत्यनिष्ठा,निष्पक्षता आणि लोकहिताचा विचार हीच खरी पत्रकार दिनाची शिकवण आहे. आधुनिक काळात डिजिटल माध्यमे,सोशल मीडिया यांचा प्रभाव वाढला असला तरी पत्रकारांनी नैतिकता आणि जबाबदारी पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित वरिष्ठ पत्रकारांनी त्यांना पत्रकारिता करत असताना आलेल्या अनुभवाची माहिती सर्वांसमोर सादर केली. यामध्ये बाळासाहेब वाघमोडे,परळीकर यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच पत्रकार योगेश तुरेराव यांनीही त्यांचे अनुभव कथन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारितेच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी पत्रकार दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून आत्मपरीक्षणाचा दिवस असल्याचे मत व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालय,सोलापूर येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या योगदानाची आठवण करून पत्रकारितेतील नैतिकता व जबाबदाऱ्या अधोरेखित करण्यात आल्या.
