सोलापूर : सोलापूर जिल्हा न्यायालयिन कर्मचारी व अधिकारी यांच्या साठी सोलापूर डिस्ट्रिक्ट कोर्ट प्रीमियम लीग चे उद्घाटन दिनांक १८ जानेवारी रविवार रोजी सकाळी आठ वाजता भंडारी मैदान विजापूर रोड येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. सदर स्पर्धेचे उद्घाटन मनोजजी शर्मा,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांचे शुभ हस्ते व ज्येष्ठ वकील ॲड. मिलिंद थोबडे,चेअरमन व सदस्य महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल यांच्या अध्यक्षते खाली पार पडले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिगंबर निकम,शर्मा,सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव,उपाध्यक्ष रियाज शेख,प्रबंधक हरिदास पोटlबति व मुकुंद ढोबळे, विविध कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष - शकील शेख,शाम राजेपांढरे,सुकृत कुलकर्णी व संजयजी मॅकलवार,चेअरमन जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्था सोलापूर,संयोजक तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य न्यायालयीन स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशन,नबी लाल शेख,पवन गायकवाड, इरेश बिराजदार,रफीक पठाण,न्यायिक अधिकारी,कर्मचारी, वकीलवर्ग व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर स्पर्धेचे हे १४ वे वर्ष आहे.
सदर स्पर्धेत शहर व सर्व तालुक्यातील १६ पुरुष संघ व ०४ महिला संघानी सहभाग नोंदविला आहे. सदर स्पर्धा ह्या ०२ मैदानात दिनांक १८,२४,२५,२६ जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी ०८ ते सायंकाळी ०५.३० पर्यंत होणार आहेत. स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण दिनांक २६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थितीत होणार आहे. सदर स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व रोख स्वरूपाचे बक्षीस देण्यात येत असते.
