Ticker

6/recent/ticker-posts

जिजाऊ ज्ञान मंदिरात बालदिन उत्साहात साजरा..!



सोलापूर : कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलामध्ये बालदिन अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरा करण्यात आले.

स्वर्गीय प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब निळ यांनी केले. या बाल दिनाच्या उचित्य साधून प्रशालेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी आणि हिंदीतून अतिशय उत्कृष्ट भाषणातून बाल दिनाचे महत्त्व पटवून दिले.


यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष गणेश निळ म्हणाले, पंडित नेहरूंना या देशातील तरुणांच्या मध्ये भवितव्य दिसत होते आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने या तरुणांवर त्यांनी लहान मुलांवर त्यांनी प्रेम केले आणि ह्या तरुणांमध्येच देशांमध्ये फार मोठे बदल करण्याची क्षमता असल्याचेही यावेळी गणेश निळ यांनी सांगितले.

नर्सरी प्ले ग्रुप मधील विद्यार्थ्यांनी रिमिक्स परंतु देशभक्तीच्या गीतातून बाल दिनाचे महत्त्व पटवून देत  नयनरम्य अशा प्रकारचे नृत्य सादर केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी या छोट्या बालचमुना टाळ्यांची मनमुराद दाद दिली.


या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अर्चना औरादे मुख्याध्यापक वैभव मसलकर विकास जाधव आदी सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोराडे मॅडम यांनी केले