Ticker

6/recent/ticker-posts

Wow संस्थेच्या वतीने मनगोळी मधील पूरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तूचे वाटप..!


सोलापूर : wow संघटनेचे च्या अध्यक्ष विद्या लोळगे  यांच्या वाढदिवसा निमित्याने सोलापूर चे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदर्श घेऊन स्वतःवाढदिवस साजरा न करता विद्या लोलगे यांनी प्रत्यक्ष मनगोळी या गावामध्ये जाऊन ते थील पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत करून त्यांच्या पाठीवर आधाराचा हात आणि डोळ्यात आशेचे किरण देऊन त्यांचे दुःखात सहभाग होऊन  मनगोळी या गावामध्ये पूरग्रस्ताना महिलाना जीवना आवश्यक वस्तू सॅनिटरी पॅड फिनेल आंघोळीचा साबण कपड्यांचे साबण वाटप करण्यात आले. या वेळी गावातील सर्व महिलांनी आभार व्यक्त करत विद्या लोलगे यांना वाढदिवस च्या शुभेच्छा दिल्या. 



त्यावेळी गावाचे सरपंच संजय गायकवाड व त्यांच्या पत्नी आणि wow संघटनेचे पदाधिकारी-वसंत जाधव 
शोभा गायकवाड,मार्था आसादे,योजना कामातकर, शारदा मसूती,प्रिया कुलकर्णी,गीता मुळे,रेखा रूद्ररोज, 
तेस्विनी मनगोळी,स्वाती मुकणार,मनीषा नलावडे यांच्यासह Wow संस्थेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.