०६ नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
सोलापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी गोहोळ तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर २०२५ आहे. या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरिता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत,असे आवाहन पदनिर्देशित अधिकारी,विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ तथा तहसिलदार मोहोळ यांनी केले आहे.
भारत्त निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या या निवडणुकांकरिता मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. दोन मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याकरिता ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये पदवीधर मतदार संघाकरिता ०७ मतदान केंद्र तयार करणेत आलेली आहेत. त्यामध्ये मोहोळ शहरामध्ये राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला येथे २,मौजे टाकळी सिकंदर येथे २ व मौजे नरखेड,शेटफळ,सावळेश्वर येथे प्रत्येकी एक तर शिक्षक मतदार संघाकरिता एकूण ५ मतदान केंद्र तयार करणेत आलेली आहेत. त्यामध्ये मोहोळ,नरखेड, शेटफळ,सावळेश्वर,टाकळी सिं.येथे प्रत्येकी एक अशी एकूण १७ मतदान केंद्र मोहोळ तालुक्यात तयार करणेत आलेली आहेत.
पदवीधर मतदार संघाकरिता फॉर्म नंबर १८ तर शिक्षक मतदार संघाकरिता फॉर्म १९ पात्र मतदार यांनी भरुन द्यावयाचा आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून तहसीलदार मोहोळ,गटविकास अधिकारी मोहोळ,मुख्याधिकारी नगरपरिषद मोहोळ, महसूल नायब तहसीलदार मोहोळ,निवासी नायब तहसीलदार मोहोळ,निवडणूक नायब तहसीलदार मोहोळ यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. सदर अधिकारी यांचेकडे मतदार यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरुन द्यावयाचे आहे. असे आवाहन मतदार यांना पत्रकान्वये करण्यात आले आहे.