सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी वयाच्या २२ व्या वर्षी विजय मिळवून इतिहास घडविला आहे.सिद्धी वस्त्रे या तरुणीने स्वप्नात देखील पहिला नव्हते की,नगराध्यक्ष व्हायच,राजकारणात यायचं. तिने बोलताना सांगितलं,स्पर्धा परीक्षा देऊन बँकेची किंवा एमपीएससी,युपीएससी स्पर्धा परीक्षा द्यायचा ठरवलं होता. मोहोळ तालुक्याचे नगराध्यक्ष पद एससी कोट्यासाठी आरक्षित झाल्यानंतर रमेश बारसकर या माजी नगराध्यक्षकांनी सिद्धी वस्त्रे या महाविद्यालयीन तरुणीला राजकारणात आणल. भाजप सारख्या बलाढ्य पक्षाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्या समोर सिद्धी वस्त्रेला घेऊन दंड थोपटले. सिद्धी वस्त्रे या तरुणीने भाजपच्या शतील क्षीरसागर या महिला उमेदवाराचा १७० मतांनी पराभव केला.
घरची परिस्थिती बेताची त्यासाठी सात हजार रुपयांची नोकरी केली - सिद्धी वस्त्रे या महाविद्यालयीन तरुणीने महाराष्ट्र राज्यातील राजकारणात इतिहास घडविला आहे. बीकॉम संपल्यानंतर एम कॉमला प्रवेश घेतला.घराची परिस्थिती बेताची असल्याने सीएकडे सा हजार पगारीवर नोकरी केली. कुटुंबाला हातभार लावत स्पर्धा परीक्षा द्यायची आणि नोकरी करण्याचं स्वप्न सिद्धीने बघितलं होत. तीस वर्षापूर्वी आजोबा मोहोळ गावचे सरपंच होते. वडिलांनी मात्र राजकारणात न जाता सर्वसाधारण नोकरी स्वीकारली होती. आई गृहणी असून दोन भाऊ आणि एक बहीण असा सिद्धीचा परिवार आहे. मध्यम वर्गातील सिद्धीने थेट नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे. आई वडिल आणि दोन्ही भावंडांनी प्रचारात माझ्यासाठी वाहून घेतले होते. आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत मी नगराध्यक्ष झाले असे सिद्धीने सांगितले.
