सोलापूर : दिवाळीच्या पावन सणाच्या आधी,भारतीय जैन संघटनेच्या वतीने गरजू आणि अंध कुटुंबीयांना दिवाळीच्या किटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गुजराती मंडळ हॉल येथे आयोजित केला गेला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष केतन शहा, महिला राज्य सचिव संतोष बंब,विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते,शहर अध्यक्ष अशोक भालेराव,महिला अध्यक्ष कल्पना भन्साली,महिला सचिव निर्मला मेहता आणि प्रशांत वर्धमाने,विक्रांत बशेट्टी. या उपक्रमात लुई ब्रेल अंध विकास बहुउद्देशीय संस्था,सोलापूर चे अध्यक्ष सुरज सोनटक्के आणि सचिव संतोष देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाद्वारे अंध व गरजू कुटुंबीयांना,घरगुती वस्तू तसेच दिवाळीच्या आवश्यक वस्तूंचा किट वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष भाषण करताना केतन शहा म्हणाले की “आपल्या समाजातील गरजू व दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आनंद,प्रकाश आणि आधार पोहचवणे हीच खरी बिजेएस ची समाजसेवा आहे.”
कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्वादिष्ट भोजन देऊन मान्यवरांनी उपस्थितांना सेवा,सहानुभूती आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आले.
