मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 49 कोटींच्या विकास निधीची मागणी; येत्या 8 दिवसांत 3 कोटींच्या कामांची मंजुरी
सोलापूर : सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 1, 3 व 4 मधील विकासकामांसाठी एकूण 49 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून,येत्या 8 दिवसांत 3 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, व शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली.
या वेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बैठकीदरम्यान,सोलापूर शहरातील भाजपचे माजी नगरसेवक आणि दोन माजी उपमहापौरांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत पुनरागमन (घरवापसी) केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यानंतर,प्रभाग क्रमांक 3 मध्ये जेमिनी माता मंदिरात महापूजा व वसुबारस निमित्त गोमाता पूजन आयोजित करण्यात आले. या प्रसंगी सुरेश पाटील म्हणाले,“मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे डोक्यावर बर्फ,तोंडात साखर आणि पायात भिंगरी ठेवून काम करू. सोलापूर शहरात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाच्या योजना पोहचवाव्यात.”
सोलापूर शहरातील खड्डे,ड्रेनेज व दिवाबत्ती या नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामे लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमा नंतर लाडू वाटप करण्यास आले.
कार्यक्रमानिमित्त शशिकांत थोरात,संजय भूमकर,अक्षय अंजिखाने,रेवण चव्हाण,सागर आतनूरे,संदीप पाटील, बिपीन पाटील,सुरज पाटील,संजय होमकर,संजय साळुंखे,गुरुराज पदमगोंड,अप्पू उळागड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सुरेश पाटील समर्थक, प्रभागातील नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
