महाराष्ट्र पोलीस बंधू बघिनी यांना दिवाळी बोनस जाहीर करून महाराष्ट्र पोलिसांची दिवाळी गोड करा.
जनशक्ती शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिवाळी बोनस जाहीर करून पोलीस बांधवांच्या हितासंबंधी वेगवेगळ्या मागण्या सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आल्या...
‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’
हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की,महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत अश्या पोलीस बांधवांच्या हितासंबंधी काही मागण्या सविनय सादर करून मागण्या पूर्ण कराव्यात व महाराष्ट्र पोलिसांची दिवाळी गोड करण्याची मागणी यावेळी केली.
१) पोलीसांना ८ तास नोकरी करुन ८ तासापेक्षा जास्त नोकरी झाल्यास ताशी रु.१०० प्रमाणे ओव्हर टाईम भत्ता मिळण्यात यावा.
२) सहाव्या वेतन आयोगा संदर्भातील जाचक शासन निर्णय रद्द होऊन सुधारित वेतन निश्चिती होऊन थकबाकीची रक्कम रोखीने मिळण्याबाबतचा सुधारीत शासन निर्णय मिळणेबाबत.
३) नव्याने भरती झालेल्या पोलीस बांधवांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून द्यावेत.
४) तिस वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली परंतु त्यांना इन्क्रिमेंट पगार वाढ दिलेली नाही श्रेणी पीएसआय झालेल्या कर्मचाऱ्यांचे दहा दहा हजार रुपये ड्रेस घेण्यातच खर्च होतात त्यामुळे त्यांना इन्क्रीमेंट पगार वाढ मिळावी.
५) सेवा करत असताना आपत्कालीन परिस्थिती मध्ये जीवाची बाजी लावत कर्तव्य पार पाडताना पोलीस बांधवांना होणाऱ्या अपघात परिस्थिती मध्ये योग्य तो उपचार मिळवून सर्व वैद्यकीय सुविधा मिळण्यात याव्यात.
६) पोलीस भरती मध्ये पोलीस पाल्यांना राखीव १५% आरक्षण द्यावे.
७) सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना व अपघाताने निधन पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीस तात्काळ पेन्शन मंजूर व्हावी.
८) पोलीस कल्याण निधी (पोलीस वेल्फेअर फंड) महामंडळाला मंजूरी मिळून त्रयस्त व्यक्तीला महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात यावे.
९) पोलीस बांधवांच्या गणवेश भत्ता मध्ये वाढ करावी.
१०) पोलीस वसाहतीतील इमारतींचे स्ट्क्चरल ऑडीट मध्ये धोकादायक, अतिधोकादायक सिद्ध झालेल्या इमारतींकडे तात्काळ लक्ष केंद्रित करावे.
११) मेडीकल बील,टी.ए.बील,थकबाकी बील (एरीअर्स) धनार्जित रजेचे बील यांसंदर्भाच्या देय रक्कमेच्या बिलाबाबत एक ठराविक मुदत ठेवण्यात यावी व दप्तर दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
१२) विनंती अर्ज,अपिलीय अर्ज,चौकशी अर्ज व तक्रार अर्ज यासंदर्भात करण्यात आलेल्या पत्रव्यवहारावर एका ठराविक मुदतीत ते प्रकरण निकाली काढण्यात यावीत व दप्तर दिरंगाई झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.
१३) गृह विभागातील कर्मचाऱ्यांना इतर विभागातील कर्मचाऱ्यांपेक्षा पगार व ग्रेड पे कमी असून तो वाढवून मिळण्यात यावा.
१४) पोलीसांना निवडणूक,अधिवेशन व VVIP कर्तव्य बजावण्यासाठी विशेष संरक्षण भत्ता मिळावा.
१५) महाराष्ट्रातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात यावा.
१६) रजा त्वरीत मंजूर झाल्या पाहिजेत व सिक पास बिनशर्त मिळावेत.
१७) संडास बाथरुम,चेन्जींग रुम,आराम कक्ष व पिण्याचे शुध्द पाणी मिळावे व सर्व पोलीस ठाणे,वाहतूक विभाग व सशस्त्र पोलीस मुख्यालय येथे प्रसाधन गृहाच्या स्वच्छतेसाठी व साफसफाईसाठी सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
१८) कार्यालयीन कामकाजासाठी च्या प्रवास भत्त्यात आवश्यक तेथे वाढ करण्यात यावी.
१९) सहाव्या वेतन आयोगात महसूल कर्मचारी गट 'क' (तलाठी) आणि पोलीस कर्मचारी गट 'क' यांच्या वेतनामध्ये तफावत असून ती तफावत दूर करण्यात यावी.
२०) महाराष्ट्र पोलीस दलाच्या वेतनात इतर राज्यांप्रमाणे वाढ करण्यात यावी.
२१) बेकायदेशीर राहणाऱ्या परप्रांतीयांना फुकटात घरे दिली जातात परंतु कायदेशीर भाडे भरणारा महाराष्ट्र पोलीस मात्र बेघर या परिस्थिती चा विचार करून पोलीस बांधवाना हक्काची घरे मिळावीत.
२२) याप्रमाणे बेस्ट बस चा प्रवास मुंबई पोलीसांना मोफत आहे त्याप्रमाणे मुंबईतील लोकल ट्रेन चा प्रवाससुध्दा मोफत करण्यासाठी शासनाने आदेश काढावा.
२३) बृहन्मुंबई" पोलीस सोसायटीच्या [पतसंस्थेच्या) उप 'शाखा अंधरी,घाटकोपर येथे नव्याने स्थापन करण्यासाठी मंजूरी मिळावी.
२४) बृहन्मुंबई पोलीस सोसायटीच्या माध्यमातून कमीत कमी व्याज दरात गृहकर्ज उपलब्ध करुन दयावे.
२५) स्वरतरंग,उमंग व संगीतबारी हे कार्यक्रम बंद करुन त्या ऐवजी पोलीसांना सर्वप्रकारच्या आजारांवर वैदयकीय सुविधा मिळाव्या.
२६) सातव्या वेतन आयोगात झालेला अन्याय दूर करुन पोलीस हा संरक्षण विभागात मोडत असल्यामुळे त्याला केंद्र/महसूल विभागाप्रमाणे वेतन वाढ मिळावी हि नम्र विनंती.
२७) पोलीस दल हे संरक्षण व सुरक्षा आणि अति महत्वाच्या विभागात मोडत असल्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी.
२८) पोलीस मतदारसंघाची स्थापना करून विधानपरिषदेवर किमान ४ जागा पोलीस मतदारसंघासाठी मंजूर कराव्यात.
२९) आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुलभ करावी.
३०) महाराष्ट्र पोलीस कुटुंबियांच्या विविध समस्यांचे निराकरणासाठी "समन्वय समिती" पूर्णगठीत करण्यात यावी.
३१) पुरुष पोलीस अंमलदारांना पालकत्व रजा ४५
दिवस मिळावी व त्यात कोणत्याही स्वरुपाचे अट नसावी.
३२) पोलीस खात्यामध्ये सर्व आदेश व्हाट्सअप वरूनच होतात व मोबाईलचा सर्रास वापर होत आहे त्याची बिल पोलिसांनाच भरावे लागते त्याकरता मोबाईल अलाउन्स महिना पाचशे रुपये मिळावा
३३) अभिनेता अक्षय कुमार यांनी पोलीस खात्यातील बुटाच्या संदर्भात मांडलेला प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.
सदर मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन मागण्या मान्य कराव्यात व प्रत्येक सणासुदीला रस्त्यावर उभा राहून आपल्या जीवाची परवा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव पोलीस भगिनी यांच्यासाठी सरकारने दिवाळी बोनस देऊन दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करावी असे अतुल खुपसे पाटील यांनी सांगितले.
