सोलापूर : बक्षीहिप्परगे गावचे बिनविरोध नूतन सरपंच भाऊराजे जाधव यांचा माजी सरपंच बाबुराव चव्हाण (मालक) यांच्या हस्तेसत्कार करण्यात आले. यावेळी प्रा. परमेश्वर हटकर आणि हनुमंत पवार सर यांनी शुभेच्छा देत असताना सरपंच या पदाची जबाबदारी पार पाडत असताना जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटन समोर ठेवून कार्य करण्यास सांगितले.
यावेळी महाराष्ट्रातील आदर्श सरपंच पेरे-पाटील यांच्या कार्याचाही उल्लेख केला. सदरील कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम कोळेकर,माजी सरपंच शेखुंबर शेख,सोसायटीचे चेअरमन संतोष चव्हाण, व्हाईस चेअरमन दिगंबर जाधव,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी यादव,शिवाजी राठोड,महादेव खांडेकर, कार्यक्रमाचे आयोजक अकबरभैया शेख,रतन राठोड, नामदेव माळी,हरिदास जाधव,सुरेश सिद्धे, सौदागर शिंदे,हुसेन शेख,पैगंबर शेख,अमीर शेख,शिवाजी चव्हाण आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी केले तर आभार बालाजी यादव यांनी मानले.
