Ticker

6/recent/ticker-posts

अनुकंपा तत्त्वावर दिलेली संधी–शासनाची त्या कुटुंबाप्रती असलेली जबाबदारीच

विशेष स्टोरी...
     
राज्य शासनाने यापूर्वीचे अनुकंपा भरती चे सर्व 40 जीआर रद्द करून दिनांक 17 जुलै 2025 रोजी नवीन शासन निर्णय अनुकंपा भरतीसाठी लागू केला. त्यामुळे राज्यघरातील अनुकंपा भरतीच्या रिक्त जागांपैक 80% जागा आज संपूर्ण राज्यभरात भरल्या जात आहेत. उर्वरित जागा ही पुढील तीन-चार महिन्यात भरल्या जाणार आहेत. शासनाने अनुकंपा तत्त्वावर दिलेली ही संधी म्हणजे त्या कुटुंबावर केलेला उपकार नाही, तर शासनाची त्या कुटुंबाप्रती असलेली जबाबदारीच आहे. व याच भावनेमधून शासनाने ही भरती मोहीम आज सर्वत्र राबवलेली आहे.


    
सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज एक अत्यंत भावनिक आणि आश्वासक क्षण साक्षीदार ठरला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अनुकंपा तत्त्वावर ड वर्गातील ६०, क वर्गातील ५० उमेदवारांना तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेल्या ९६ लिपिक वर्गीय उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात केवळ नियुक्तीपत्र नव्हते, तर अनेक कुटुंबांच्या वेदनांना दिलासा देणारी शासनाची जबाबदारी होती.

कुटुंब प्रमुख गमावलेली घरं–वेदनेतून उगम पावलेली संधी - अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळवणाऱ्या उमेदवारांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते,तर मनात शासनाबद्दल कृतज्ञतेची भावना. काही महिन्यांपूर्वी या घरांमध्ये दुःखाचे सावट होते–वडील किंवा आई शासकीय सेवेत कार्यरत असताना अचानक निधन झाले आणि कुटुंबाचा आधारच हरपला. शिक्षण, रोजीरोटी,भविष्य या सगळ्या गोष्टी अनिश्चिततेच्या गर्तेत गेल्या. अशा या कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट आलेले होते.



पण आज,शासनाच्या सहानुभूतीपूर्ण निर्णयामुळे या कुटुंबांना पुन्हा एक आश्वासक दिशा मिळाली आहे. ही केवळ नोकरी नाही, तर एका कुटुंबाच्या स्वाभिमानाची पुनर्बांधणी आहे. या नियुक्त्या म्हणजे शासनाच्या सहानुभूतीची साक्ष आहेत. त्या घरांमध्ये जेव्हा कुटुंब प्रमुख गमावले गेले,तेव्हा काळोख होता. पण आज, शासनाच्या निर्णयामुळे त्या घरांमध्ये पुन्हा आशेचा उजेड पसरला आहे. ही केवळ नियुक्ती नाही तर ही एक नव्या जीवनाची सुरुवात आहे.

उमेदवारांचे भावनिक उद्गार -  खुशाल केशव पवार म्हणतात,"मुख्यमंत्री साहेबांचे आणि शासनाचे मनःपूर्वक आभार. ही संधी माझ्या कुटुंबासाठी नवजीवन आहे."

१) किशोर अनंता शिरतोडे भावूकपणे म्हणतात, "वडिलांच्या निधनानंतर आमच्यावर मोठी जबाबदारी आली होती. आज शासनाने दिलेली संधी आमच्या भविष्याला दिशा देणारी आहे."

२) विवेक साळुंखे,शुभांगी टाकळीकर,नितीन बंडगर यांसारख्या अनेक उमेदवारांनी शासनाच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या शब्दांतून केवळ आभार नव्हते,तर एक नव्या सुरुवातीचा आत्मविश्वास होता.



 राज्य शासनाची भूमिका–संवेदनशीलतेचा आदर्श

महाराष्ट्र शासनाने अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देताना केवळ नियमांचे पालन केले नाही,तर मानवी मूल्यांना प्राधान्य दिले. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य,सामाजिक सन्मान आणि मानसिक आधार मिळाला आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने अनुकंपा तत्त्वाला केवळ धोरण म्हणून नव्हे, तर संवेदनशीलतेचा एक मानवी पूल म्हणून स्वीकारले आहे.