सोलापूर : वैराग साकत प्रशाला साकत ता.बार्शी प्रशालेत इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारी माधुरी भुजंग मोरे हिने जिल्हास्तरिय ८०० मीटर धावणे स्पर्धेत दूसरा क्रमांक पटकाऊन गावाचे व शाळेचे नाव रोषण केले आहे.
पंढरपुर येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्थरिय स्पर्धेतून माधुरीची निवड पुणे विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे तिच्या यशात क्रिडा शिक्षक विशाल गुट्टे सह शिक्षक सिध्देश्वर मोरे एल डी मोरे वडील भुजंग मोरे यांनी परिश्रम घेतले तर शाळेतील स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आलेले वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धावपट्टू कुंदन गावडे यांच्या भाषणाणे प्रेरीत होवून धावपट्टू पी.टी.उषाचा आदर्श ठेवून तिच्यासारख धावण्यात यश प्राप्त करून देशाचे नाव रोषण करण्याचा माधुरीचा मानस आहे. मुख्यध्यापक कळसाईत सर सहशिक्षकांनी माधुरीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
