Ticker

6/recent/ticker-posts

लायन्स इंटरनॅशनल रिजन वन तर्फै श्रीमंत होण्याचे मार्ग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन


सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल रिजन वन चेअरमन लायन. अँड.श्रीनिवास कटकुर आयोजित  व्याख्यान 2025 याचे आयोजन शनिवार दिनांक 11/ 10 /2025 रोजी संध्याकाळी ठीक 6 सहा वाजता हॉटेल निसर्ग, रेल्वे लाईन सोलापूर येथे आयोजित केलेले आहे .



या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून अमोल कदम ( कोल्हापूर) हे भारतातील प्रसिद्ध अर्थतज्ञ व जागतिक दर्जाचे व्याख्याते व मोटिवेशनल स्पीकर हे या कार्यक्रमात व्याख्यान देण्यासाठी येणार आहेत व याचा विषय श्रीमंत होण्याचे मार्ग व सुखाचा शोध,उद्याचे स्वप्न व आजचे  नियोजन व आर्थिक संपन्न होण्यासाठी मार्गदर्शन अशा विविध विषयावर सुंदर व्याख्यान आयोजित केलेले आहे.



कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन.अँड.श्रीनिवास कटकुर रिजन चेअरमन हे भूषविणार आहेत  तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लायन. एमजेएफ.राजेंद्र शहा (कासवा) उपप्रांतपाल हे राहणार आहेत तसेच लायन. मंगेश दोशी (फलटण डिस्ट्रिक्ट जीएलटी को आँर्डिनेटर हे राहणार आहेतव या  कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून हरिदास पोटाबत्ती (प्रबंधक  सोलापूर जिल्हा कौटुंबिक न्यायालय सोलापूर) हे राहणार आहेत तर विशेष अतिथी विनोद कुणगिरी (प्रसिद्ध अर्थतज्ञ  व इनवेस्टमेंट व फायन्नास  गुरु) व या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती म्हणून लायन.  डॉ.गुलाबचंद शहा (माजी  प्रांतपाल) तसेच लायन. एमजेएफ अरविंद कोणशिरसगी माजी प्रांतपाल हे या कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार आहे.



या कार्यक्रमाचे आयोजक रिजन चेअरमन लायन अँड. श्रीनिवास कटकुर हे आहेत तर आयोजन कमिटी मध्ये रिजन सचिव लायन.चंद्रकांत यादव व रिजन  कॉआँर्डिनेटर व अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल चे अध्यक्ष लायन. प्राध्यापक. स्वामीनाथ कलशेट्टी आहेत तर आयोजन कमिटी मध्ये सर्व झोन चेअरमन लायन. मीना जैन व लायन.विनोद बुडुख,लायन.श्रीनिवास पुजारी,लायन मल्लिकार्जुन मसुती,लायन सोमशेखर भोगडे व आयोजन कमिटीमध्ये सर्व अध्यक्ष लायन.नंदा लाहोटी,लायन.डॉ.तेजस लाड,लायन.अभय खोबरे, लायन.देवेंद्र बिराजदार,लाईन डॉक्टर कृष्णचंदक लायन. राणाप्रताप देशमुख,लायन.रवी राऊत,लायन.पल्लवी बजाज,लायन.डॉ.मंदार सोनवणे,लायन.डॉ.संध्या गावडे,लायन.प्रा.नवनाथ बंडगर,लायन.विश्वनाथ आवटे हे सर्व आयोजन कमिटीमध्ये  व्याख्यान यशस्वी  करण्यासाठी कार्यरत आहेत व कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन केलेले आहे,तरी सर्वजण या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे पत्रकाद्वारे रिजन चेअरमन लायन. अँड.श्रीनिवास कटकुर यांनी कळविले आहे.