Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक लिंगायत महासभा चे ७ वी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक

 जातीय जनगणनेत लिंगायत म्हणून नोंद करा: डॉ.शिवानंद जामदार (माजी आय.ए.एस.अधिकारी)

सोलापूर : कर्नाटक येथे २२ सप्टेंबरपासून कर्नाटक राज्यात सुरू होणाऱ्या आणि पुढील वर्षी केंद्रात सुरू होणाऱ्या जातीय जनगणनेत,लिंगायतांनी धर्म रकान्यात लिंगायत म्हणून नोंदणी करावी आणि त्यांची जात जातीच्या रकान्यात नोंदवावी. बसवण्णांचे जन्मस्थान बसवन बागेवाडी येथे सुरू झालेला बसव संस्कृती महोत्सव कर्नाटक राज्यभरात आयोजित केला जाईल आणि बसव भक्त आणि लिंगायतांनी त्यात सहभागी होऊन तो यशस्वी करावा,असे जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ.शिवानंद जामदार म्हणाले.
रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सोलापूर-विजयपुर महामार्गावरील विद्यागिरी येथील विद्या विकास सौधच्या पतंजली सभा भवनात आयोजित जागतिक लिंगायत महासभा चे ७ व्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. गेल्या काही वर्षांत महासभेची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये  सभाचे विस्तार झाले आहे. लोकांना आता खात्री पटली आहे की लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत समाजाच्या हितासाठी कार्यक्रम आयोजित करून सामाजिक समस्या सोडवण्यात सक्रिय आहेत. येणाऱ्या जात जनगणनेत प्रत्येक लिंगायत व्यक्तीने धर्माच्या रकान्यात लिंगायताचे नाव आणि जातीच्या रकान्यात त्यांची जात लिहिणे अनिवार्य असल्याचे आवाहन त्यांनी केले.


या बैठकीचे अध्यक्षसंघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती केम्पगौडा यांनी अनेक ठराव मांडले, जे महासभेच्या सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले.
महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तूरे यांनी आपले विचार मांडताना,कुडलसंगम ते मंगळवेढे मार्गे सोलापूर ते बसवकल्याणा असा कॉरिडॉर महामार्ग निर्माण व्हावा. मंगळवेढे येथे बांधल्या जाणाऱ्या बसवन्ना स्मारकासाठी सरकारने जागा निश्चित केली आहे आणि जागतिक लिंगायत महासभेच्या प्रतिनिधींना ते भेट देण्याची विनंती केली आणि बसवकल्याणाच्या अनुभव मंडपाच्या धर्तीवर ते बांधावे अशी सूचना केली.

बसवकल्याणातील दसरा दरबार व आडवी पालखी सारख्या  कार्यक्रमाची लिंगायत आणि खपून न घेता प्रतिघटना करावे असे मालगुडीचे महास्वामीजीनी हाक दिली असून त्यासाठी लिंगायतांनी जोरदार आंदोलन करावे,असे आवाहन केले. बेळगांवचे बसवराज रोटी,  अशोक मालगली,विजयपुराचे अध्यक्ष बसवनगौडा हरनाल,कार्याध्यक्ष एस.एच.नाडागौडा,सरचिटणीस बसवराज कोंडागुळी,सोलापूरचे परमानंद अलगोंडा, सोलापूरच्या महिला जिल्हा अध्यक्षा राजश्री थलंगे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजशेखर तंबाके,कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे,सचिव बसवराज कनजे,संगण्णा गेज्जी, सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव,पुणे विभागाचे प्रमुख मल्लिकार्जुन मुलगे,लातूरचे जिल्हाध्यक्ष रवी बिराजदार,सांगलीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शेगावे,यांच्यासह सर्व शाखे चे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयपुर युनिटचे कार्याध्यक्ष एस.एच. नाडागौडा यांनी मंचावर उपस्थितांना टोपी,रुद्राक्षी आणि विभूती देऊन गौरविले.


चित्रदुर्ग येथे झालेल्या ०६ व्या सभेचे इतिवृत्त वाचून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संघटनेचे चे सरचिटणीस डॉ. शिवानंद जामदार यांनी लिहिलेल्या "अनुभव मंडप इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढे काय?'' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीत निर्णय घेण्यात आले - जागतिक लिंगायत महासभेच्या बैठकीत अधिक सदस्यांची नियुक्ती करणे. माननीय न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालाचा पुनर्विचार करण्याची विनंती राज्य सरकारला करणे आणि केंद्र सरकारला त्याची पुन्हा शिफारस करण्याची विनंती करणे. २०२५-२६ या वर्षात किमान एक विशेष कार्यक्रम आयोजित करणे. देशभरात होणाऱ्या बसव संस्कृती महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी संघटनेचे चे ऑनलाइन मासिक मासिक इंग्रजीमध्ये प्रकाशित करणे, लिंगायत वधू-वरांसाठी केंद्र स्थापन करण्यासाठी वेबसाइट स्थापन करणे,संघटनेचे पाच वर्षांच्या कामगिरीचे प्रकाशन करणे.