Ticker

6/recent/ticker-posts

चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे वाचले गोमातेचे प्राण


सोलापूर : माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे वाचले गोमातेचे प्राण. प्रभाग क्रमांक २६ मधील भाग्यलक्ष्मी पार्क येथे एक गोमातेचे वासरू चरत चरत सेफ्टी टॅंक मध्ये पडले बाबत तेथील महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक शेळवणे काका यांनी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना वरील गाईचे वासरू सेफ्टी टॅंक मध्ये पडले बाबत कळविल्याने त्याची दखल घेत तात्काळ सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांना संपर्क साधून संदर्भ माहिती सांगितल्याने तात्काळ आपत्कालीन,कक्ष येथील जेसीबी व रेस्क्यू टीम पाठवून देऊन सदर ठिकाणी रेस्क्यू टीम व स्थानिक तरुण कार्यकर्ते यांच्या संगनमताने सदर गाईचे वासरू जिवंत बाहेर काढण्यात आले.




 
त्यामुळे तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की माजी नगरसेविका चव्हाण यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे आज गौरी आवाहन पूजेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस समक्ष उभारून सदर गाईचे वासरूला जीवनदान दिले असून त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहे. आम्ही सदर बाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सांगून काहीच उपयोग झाला नाही. परंतु माजी नगरसेविका चव्हाण यांना सांगितल्यानंतर जलद गतीने हालचाली होऊन एका निष्पाप वासरूचे प्राण वाचवले आहे अशा कर्तव्यदक्ष,जागरूक,जनतेच्या हाकेला धावून येणाऱ्या माजी नगरसेविका चव्हाण ह्या आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्या नगरातील निवृत्त अधिकारी शेळकदे,सुनिता शेळवणे,मनीषा साबळे, सुनंदा कोळी,रश्मी भडकुंबे,कोमल साबळे,नागेश कोळी, नागनाथ शेळवणे,भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आधी उपस्थित होते.