Ticker

6/recent/ticker-posts

"मातोश्री गोशाळेत गोमातेचा नामकरण सोहळा संपन्न"


सोलापूर : विश्व हिंदू परिषद सोलापूर अंतर्गत राधाष्टमीच्या पावन मुहूर्तावरती जुना विडी घरकुल येथील सोना चांदी अपार्टमेंटच्या पाठीमागे
मातोश्री गोशाळा येथे ३१ऑगस्ट २०२५ रोजी गोमातेचा पाळणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता श्री सत्यनारायण महापूजनी करण्यात आली आणि राधाष्टमीच्या पवित्र मुहूर्ता वरती दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी हा गोमातेचा पाळणा समारंभ मंत्रॉचारात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आले. 

यावेळी व्यासपीठावर प्रथमेश कोठे,केतन शहा,संजयकुमार जामदार,विठ्ठल कोठे व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रथमेश कोठे यांनी विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षक च्या सोबत सदैव उभे राहण्याचा संकल्प निर्धारित केला तसेच जिल्हा मंत्री संजयकुमार जसमदार यांनी गोमातेचे महत्त्व समजावून सांगितले आणि पुढील सन्घनात्मक नियोजन सांगितले हिंदू परिषदेचे प्रांत गोरक्षा व संवर्धन गोरक्ष प्रमुख संतोष खामकर यांनी गो संवर्धनाचे महत्व आणि गरज याची माहिती दिली. 




या प्रसंगी जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार,जिल्हा संयोजक सिद्धू चर्कोपल्ली,जिल्हा सहमंत्री बाबू गिरगल,रवी बोल्ली आणि संख्या कार्यकर्ते उपस्थित होते. 





या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून मानद पशूकल्याण अधिकारी केतन शहा हे म्हणाले कोणतेही भाकड गोवंश हे कसाई यांना देऊ नये आम्ही ते घेऊन गोशाळेत सांभाळू,या भागाचे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश कोठे माजी नगरसेवक कोटा ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद आडम सामाजिक कार्यकर्ते अंबादास गोरंटला, पुरोहित गणेश आडम आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. 
        
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मातोश्री गोशाळेचे श्रीनिवास बडगंची,दीपक बंदगी,उमाकांत बुधाराम,नरेश धुंपेटी,राजू गुंडला,विशाल बुगडे,सिद्धेश्वर गुर्रम तसेच विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.