Ticker

6/recent/ticker-posts

अ.हमीद कादरी माजी एसटी कंडक्टर यांचं निधन

सोलापूर : येथील कुर्बान हुसेन नगर अरबी मदरसाचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त वाहक (कंडक्टर) अ.हमीद मुबारक कादरी यांचं वृध्दापकाळात अल्पशः आजाराने शनिवारी निधन झाले. ते मृत्यूसमयी ८२ वर्षीय होते. 

मुळेगांव रोड, बिस्मिल्ला नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा 04:30 वाजता निघून सायंकाळी बाद नमाज ए असर नंतर जडेसाब कब्रस्तानात येथे अंत्यविधी ( सुपूर्द-ए-खाक) करण्यात येणार आहे. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सून नातू नातवंडं असा परिवार आहे.