सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ जुळे सोलापूरच्या वतीने भाजपाच्या नुतन शहराध्यक्ष रोहीणीताई तडवळकर यांचा भाजप शहर कार्यालय येथे गुलाबाच्या पुष्पवृष्टीने महिला पदाधिकारी यांनी स्वागत केले.
सोलापूर शहराच्या इतिहासात प्रथमच भाजप पक्षाने स्त्री जातीच्या आदर करीत अत्यंत महत्वाचे असलेले शहर अध्यक्ष पदांची माळ पक्षश्रेष्टीने कामाची पावती बघूनच पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या माजी नगरसेविका तथा विरोधी पक्षनेत्या रोहिणीताई तळवळकर यांच्या गळ्यात माळ टाकून महत्वाची जबाबदारी दिलेली आहे. वास्तविक पाहता रोहिणीताई तळवळकर यांना सोलापूर महानगरपालिकाचा दांडगा अभ्यास असून त्या प्रत्येक क्षेत्रात अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. तसेच त्या वयाच्या २१ व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टी मध्ये एकनिष्ठ राहिल्या आहेत.
पक्षश्रेष्ठने दिलेला आदेश तंतोतंत पाळणाऱ्या व शिस्तप्रिय म्हणून त्यांच्या नावलौकिक असून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लोकहिताचे केलेली कामे संपूर्ण सोलापूर शहरात घराघरात रूजवल्याने तसेच विधानसभा निवडणुकीत शहरात ना भुतो ना भविष्य असे काम करून शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात विजय संपादन करून दाखविले आहे.
येणाऱ्या काळात सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत असून अभ्यासू नेतृत्वाची पक्षश्रेष्ठींना गरज असल्यानेच सोलापूर महानगरपालिकेच्या अभ्यासू असणाऱ्या माजी नगरसेविका तथा विरोधी पक्षनेत्या रोहिणीताई तळवळकर यांना भाजपा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर सत्कार प्रसंगी प्रभाग २६ जुळे सोलापूर समस्त नागरिकांच्या वतीने कर्तव्यदक्ष,लोकप्रिय माजी नगरसेविका राजश्री चव्हाण,माजी नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड,माजी नगरसेविका मेंनका राठोड,माजी नगरसेविका संगीता जाधव,अंबिका पाटील,संपदा जोशी,सुनिता कामाठी,अनिता गवळी,संगीता खंदारे,भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भि.चव्हाण यांच्यासह आदी भाजपा कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.