Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरातुन रे-नगर कुंभारी करिता बस सेवा सुरू



सोलापूर : सोलापूर परिवहन विभागच्या वतीने सोलापूर शहरातुन रे-नगर कुंभारी येते असलेल्या घरकुल वसाहतीत येते राहण्यास गेलेल्या नागरिकांना तसेच यंत्र माग
व बिडी कामगार यांना कळवण्यात येत आहे कि दि. ०८/०५/२०२५ पासून रेल्वे स्टेशन येथुन रे -नगर वसाहत कुंभारी येते जाण्या करीत सकाळी ०८:०० वाजता एक बस व सायंकाळी ०५:३० वाजता एक बस अश्या दोन बसेसच्या खेपा चालू करण्यात आलेले आहेत त्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. 

मार्ग क्र.१६ रेल्वे स्टेशन ते रे-नगर घरकुल वसाहत कुंभारी - सकाळ सत्र वेळ ०८:०० वाजता सुटण्याचे ठिकाण रेल्वे स्टेशन वेळ ०९:१५ वाजता पोहचण्याचे ठिकाण रे-नगर घरकुल. 

दुपार सत्र - वेळ ०५:३० वाजता सुटण्याचे ठिकाण रेल्वे स्टेशन वेळ ०६:४५ वाजता पोहचण्याचे ठिकाण रे-नगर घरकुल.

सदर बस,रेल्वे स्टेशन छ.शिवाजी चौक - कंन्ना चौक - पाणी टाकी - सुतमिल - मल्लिकार्जुन नगर - गोदूताई फाटा - कुंभारी गांव - रे नगर घरकुल या मार्गाने धावेल व त्याच मार्गाने परत येईल.

सर्व नागरिकांनी तसेच यंत्र माग कामगार व बिडी कामगार यांनी या बस सेवेचा लाभ घेता येईल.
तिकीट दर - रेल्वे स्टेशन ते रे-नगर = रु. ३०/-
छ. शिवाजी चौक ते रे-नगर           = रु. २५/-
कन्ना चौक ते रे-नगर                    = रु. २०/-
पाणी टाकी ते रे-नगर                   = रु. २०/-
मल्लिकार्जुन नगर ते रे-नगर          = रु. २०/-
कुंभारी गांव ते रे-नगर                  = रु. १५/-