Ticker

6/recent/ticker-posts

११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.

नोबल सोशल वेल्फेअर असोशियन अक्कलकोट इज्तेमाई शादियां ११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.

अक्कलकोट : (प्रतिनिधी)  नोबल सोशल वेल्फेअर असोशियन अक्कलकोट चा दरवर्षीप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला आहे. दिनांक २० एप्रिल २०२५ रविवार रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता,या इज्तेमाई शादियां सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ११ वधू-वरांचा लग्न लावण्यात आले या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.

नोबल सोशल वेल्फेअर असोशियन अक्कलकोट - इज्तेमाई शादियां सामुदायिक विवाह सोहळ्यास आलेलेल्या नातेवाईकांना आणि सर्व नागरिका साठी विवाह सोहळा संपन्न झाल्यावर दाता पीर दर्गा येथेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होते. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष हुसेन बळोरगी पुढे म्हणाले की या सामुदायिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्यात निकाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना नोबल सोशल वेल्फेअर असोशियन अक्कलकोट आयोजकांच्या वतीने कपाट,गादी,पलंग तसेच संसार उपयोगी साहित्य,वर - वधू यांना कपडे,वधूसाठी मणी मंगळसूत्र व आलेल्या पाहुण्यांना जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
हजरत दाता पीर दर्गा अक्कलकोट येथे हा विवाह सोहळा हजरत दाता पीर शाह कादरी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.

या सामुदायिक विवाह सोहळ्यात - प्रमुख उपस्थिती,हजरत मस्तुर शाह कादरी,महेश हिडोळे,ननु कोरबु,मुत्तु खेडगी,सद्दाम शेरीकर,हाजी अजीज शेख,रजाक सय्यद,मोशीन बागवान (एम.न) व इरफान दावन्ना,सैपन पठान,फारूक बबर्ची,बुडन तांबोळी,गुलाम दाता बळोरगी,मुबारक कोरबु,आझम शेखजी (सामाजिक कार्यकर्ता),मुजमील मुजावर (हैद्रा),रफिक पठाण,मुरतुज बाजे,सोहेल फरास (सामाजिक कार्यकर्ता),रशीद खिस्तके, समीर शेख,आलम कोरबु,भया नायकवाडी,नुरद्दिन सोलापूरे,इस्माईल आळंद,सलीम गावंडी आदीसह उपस्थित होते.
  
सामुदायिक विवाह सोहळ्यास आवर्जून राहिल्याबद्दल नोबल सोशल वेल्फेअर असोशियन चे संस्थापक अध्यक्ष हुसेन बळोरगी यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अजीज शेख यांनी केले.