Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री सहायता निधी सेवा आता व्हॉट्सॲपवर!


मुंबई : दि.२३ (एमडी२४न्यूज)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सहायता निधी आजार व रक्कम अवलोकन समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ०५ डिसेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ७,६५८ रुग्णांना ६७.६२ कोटींची मदत देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणाले,मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा नागरिकांसाठी अधिक सुलभ व्हावी यासाठी ती व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून द्यावी यासाठी मेटा कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. तसेच सर्व आरोग्य योजनांसाठी एकत्रित पोर्टल तयार करून अर्जप्रक्रिया सुलभ करावी,मुख्यमंत्री सहायता निधी वाढवण्यासाठी औद्योगिक सामाजिक दायित्व (CSR) मध्ये समन्वयासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करावी,मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत AI तंत्रज्ञानाचा वापर करावा,तालुकानिहाय रुग्णमित्र नेमावे, पॅनेलमध्ये अधिक रुग्णालयांचा समावेश करावा,जिओ टॅगिंगद्वारे रूग्णाला जवळच्या रुग्णालयांची माहिती द्यावी आणि टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार,मुख्य सचिव,अपर मुख्य सचिव,यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते.