Ticker

6/recent/ticker-posts

घोडेस्वाराने एका अतिरेक्याच्या हातातली AK 47 रायफल हिसकावून घेतली अन...


पहलगाममधल्या बैसरन इथं अतिरेकी पोहोचले. 
पर्यटकांना धर्म विचारु लागले तेव्हा त्यांना एका स्थानिक घोडेस्वाराने विरोध केला. घोडेस्वारीसाठी तो पर्यटकांना तिथं घेऊन आला होता. 

" यांचा धर्म कोणताही असेल; पण हे सर्वजण निष्पाप आहेत. काश्मीरचे पाहुणे आहेत. कोणावरही गोळी झाडू नका." अशी विनंती त्याने केली. अतिरेक्यांनी त्याचं ऐकलं नाही. 


या घोडेस्वाराने एका अतिरेक्याच्या हातातली AK 47 रायफल हिसकावून घेतली. तोवर दुसऱ्याने त्याच्यावर हल्ला केला. धरपकड झाली आणि या घोडेस्वाराला गोळी लागली. रक्तबंबाळ झालेल्या या घोडेस्वाराला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोवर या घोडेस्वाराचा मृत्यू झाला होता. या घोडेस्वाराच्या विरोधामुळे अनेकांचे प्राण वाचले,असं पर्यटकांनी सांगितलं. 

या घोडेस्वाराचे नाव सैय्यद हुसैन शाह !

घरात कमावणारा एकुलता एक पोरगा. 
तो अतिरेक्यांशी लढता लढता मृत्यूमुखी पडला. 
धर्माच्या नावावर कुणी कितीही वणवा पेटवला तरी जसे धर्मांध विकृत अतिरेकी असतात तसेच त्या धर्मांधतेच्या विरोधात उभी राहणारी सैय्यदसारखी लढाऊ बाण्याची माणसंही असतात ! भारत रडतो आहे आणि सैय्यद तुला सलामही करतो आहे.

सैय्यद हुसैन शाह,अभिवादन ! 

सौजन्य - श्रीरंजन आवटे