भारतीय जैन संघटना,जैन सोशल ग्रुप सेंट्रल व युगंधर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उडघाटन संपन्न,
सामाजिक कार्यात जैन समाजाचे मोठे योगदान : अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर
सोलापूर : दि.०७ (एमडी२४न्यूज) वैद्यकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो यात गरीब व गरजू लोकांना मोफत वैद्यकीय सेवा तसेच सामाजिक कार्यात खूप मोठे योगदान देणारे समाज म्हणजे जैन समाज आहे असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी काढले ते भारतीय जैन संघटना,जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल व युगंधर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्वर्गीय मातोश्री जेठीदेवी छाजेड पिताश्री मोहनलाल छाजेड यांच्या स्मृति प्रित्यर्थ मोफत दोन दिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी.जे.एस.राज्याध्यक्ष केतन शहा तर अमेरिका स्थित डॉ.राज लल्ला त्यांची धर्मपत्नी ललिता लल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युगंधर हॉस्पिटलचे डॉ.विलास हरपळे,डॉ.अभिजीत वडगावकर,डॉ अमित बसनवर,जैन सोशल ग्रुपचे संजय शहा,गौतम संचेती, अशोक छाजेड,भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील, अभिनंदन विभुते,प्रवीण बलदोटा रवींद्र गांधी गौतम संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय डॉ.शरद दीक्षित यांच्या स्मरणार्थ मातोश्री जेठीदेवी छाजेड व पिताश्री मोहनलाल छाजेड यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतनभाई शहा यांनी केले. या शिबिरासाठी छाजेड परिवाराने सहकार्य केले. कार्यक्रमाची सुरुवात णमोकार महामंत्र्याने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे सत्कार बुके व भेटवस्तू देऊन करण्यात आले.
कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी जैन संघटनेचे देशभूषण व्हसाळे,विक्रांत बेशेट्टी,माया पाटील,कोमल पाचोरे,अशोक भालेराव प्रशांत वर्धमाने महावीर नळे पंकजा पंडित वर्षा जैन जैन सोशल ग्रुपचे अशोक अतुल गांधी,रमेश बंब,दिनेश जैन, गिरीश गांधी,वसंत मुनोत,गौतम सकलेचा,संतोष शहा,हेमंत मेहता,हितेन वोरा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बंब व आभार प्रदर्शन गौतमचंद संचेती यांनी केले.
